Geography day Celebration

बार्न्स कॉलेजमध्ये मकर संक्रांत व भूगोल दिनाचे औचित्य साधून रांगोळी, पोस्टर व भौगोलिक प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन

पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात मकर संक्रांत व भूगोल दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक विषयांवर आधारित रांगोळी, पोस्टर व भौगोलिक प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्या प्रा. के. डी. शारा यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अंजु सोंखला यांची उपस्थिती होती.

स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि भौगोलिक समस्यांवर आपल्या कलात्मक दृष्टिकोनातून उपाय सुचवले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रा. शुभांगी जोशी यांनी आपले मनोगत मांडताना सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

प्रमुख पाहुणे प्रा. अंजू सोंखला यांनी अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले कलात्मक कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी दिली असून, सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम खूप महत्त्वाचा ठरेल असे मत व्यक्त केले. ,

तर अध्यक्षीय भाषण प्रा. के. डी. शारा यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला चालना देत सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य,प्रा. कल्पेश भोईर यांनी भ्रमणध्वनीद्वारे या कार्यक्रमास शुभेच्छा व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

आभार प्रदर्शन प्रा. रुपाली अहिवले यांनी केले,

तर सूत्रसंचालन कु. पावले दाणीया हिने केले.

या प्रसंगी प्रा. चंद्रकांत मुकादम, प्रा. गीता कोरके, प्रा. चेतना चोडणकर, यांसह सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Scroll to Top