DLLE – Mumbai University – Udaan Festival

बार्न्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागाच्या वतीने होणाऱ्या उड्डाण महोत्सवात चमकदार कामगिरी!

मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागाच्या वतीने आयोजित उड्डाण महोत्सव 28 जानेवारी 2025 रोजी पील्ले कॉलेज, पनवेल येथे दिमाखात पार पडला. या महोत्सवात बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, नवीन पनवेलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि नेत्रदीपक कामगिरी करत महाविद्यालयाचा सन्मान उंचावला.
या महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा प्रभावी ठसा उमटवला.

  या महोत्सवात पथनाट्य, पोस्टर निर्मिती, क्रिएटिव्ह रायटिंग, आणि वकृत्व  अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यामधील काही प्रमुख यश खालीलप्रमाणे आहेत:

1. क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धा:
कु. राहुल मुखर्जी यांनी द्वितीय क्रमांक पटकावून लेखन कौशल्याची नवी ओळख निर्माण केली.

2. पोस्टर स्पर्धा:
कु. मानसी मोरे आणि कु. मेहेर शेख यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत आपली कल्पकता सिद्ध केली.
      विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे. हे यश त्यांच्या कठोर मेहनतीचे आणि कल्पकतेचे फळ आहे. महाविद्यालयाच्या सी.ई.ओ., प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

       उड्डाण महोत्सवात मिळवलेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढला असून, भविष्यातील स्पर्धांमध्ये आणखी उत्तम कामगिरी करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. त्यांच्या यशाने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा दिली असून महाविद्यालयाने सृजनशीलता आणि कलागुणांच्या जोपासनेचा ध्यास घेतल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

    बार्न्स महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांचा अभिमान बाळगून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Scroll to Top